Advertisement

विश्वकर्मा वंशीय समाज संस्था (संघटन), महाराष्ट्र राज्य — जिल्हा लातूर द्वारा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.

लातूर : विश्वकर्मा वंशीय समाज संस्था (संघटन), महाराष्ट्र राज्य — जिल्हा लातूर यांच्या वतीने “गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. “सोहळा कर्तृत्वाचा… क्षण आनंदाचा…” या संकल्पनेतून होत असलेला हा कार्यक्रम रविवार दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता विश्वकर्मा गार्डन फंक्शन हॉल, बार्शी रोड, लातूर येथे संपन्न होणार आहे.

या सोहळ्यात २०२६ मध्ये ७५% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व विश्वकर्मा समाज बांधवांनी आपल्या पाल्यांची नावे नोंदवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य युवा अध्यक्ष, विश्वकर्मा विकास महामंडळ सुदर्शन बोराडे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी टीसी, मार्कशीट व मोबाईल नंबर खालील संपर्क क्रमांकावर पाठवावेत.

🌟 संपर्क प्रमुख 🌟सुदर्शन बोराडे — मो. ७५८८०१८८२८

विश्वकर्मा समाजातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *